कराड – शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा युवा संवाद मेळावा कराडमध्ये लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक इंद्रजित गुजर यांना दिले. संजय राऊत आणि इंद्रजित गुजर यांची कराड येथील हॉटेल महिंद्रामध्ये रविवारी भेट झाली.
यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती गुजर यांनी दिली. गुजर यांनी राऊत यांचे स्वागत केले. संजय राऊत हे एका कार्यक्रमानिमित्त कराडला आले असता, हॉटेल महिंद्रामध्ये ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक इंद्रजित गुजर यांच्यासोबत बैठक झाली.
ठाकरे गटाच्या कराडमध्ये होणार्या आगामी कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत गुजर यांनी त्यांच्याशी चर्चा केली. कराडला युवा संवाद मिळावा घेण्यात यावा, अशी मागणीही केली. त्यावर राऊत यांनी या मेळाव्याच्या आयोजनाचे आश्वासन दिले