वाई – खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे व मुले ही देवाघरची फुले हे ज्यांनी सांगितले ते म्हणजे साने गुरुजी. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपुलकी ग्रुप वाई यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गोसावी वस्तीशाळा मेणवली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
माजी जि.प. सदस्या रंजनाताई डगळे व प्रशांत थोरवे यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव सणस होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णाजी कांबळे, संताेष खरे, डॉ.रमेश तायडे, डॉ.राहुल पोतदार, सुरेश वाघ, संजीव वरे, मुख्याध्यापिका संगीता गायकवाड ह्या होत्या.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. संतोष डगळे यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा कांबळे यांनी आभार मानले.
मेणवली – शैक्षणिक साहित्य वाटप करताना रंजनाताई डगळे, प्रशांत थोरवे व मान्यवर.