सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये नाका-बंदी दरम्यान ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला भरधाव आलेल्या दुचाकीस्वारांनी उडवले. यामध्ये संबंधित पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली सचिन पवार असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,सचिन पवार हे बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये नाकाबंदी करत होते. त्यावेळी समोरून राजेश एकनाथ पवार वय 43 राहणार पिरवाडी ही व्यक्ती भरधाव दुचाकी घेऊन आली राजेश पवारला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुचाकी धडक पोलीस कर्मचारी सचिन पवार यांना बसली. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी राजेश पवारवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.