दहिवडी – भाजपच्या अनुसूचित जाती मोर्च्याच्या जिल्ह्य उपाध्यक्ष पदी माण तालुक्यातील नरवणे गावचे सुपुत्र रवी तुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार जयकुमार गोरे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि सुनील काटकर यांच्या हस्ते रवी तुपे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तुझ्या वेळी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित भिसे उपस्थित होते.
2017 साली रवी तुपे नरवणे ग्रामपंचायतच्या सदस्य व नरवणे गावच्या विविध विकास सेवा सोसायटीच्या सदस्य पदी निवडून आले. त्यानंतर 2020 ला दहिवडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवडून आले.2022 ते 2023 या कालावधीमध्ये तुपे यांनी भाजपा अनुसूचित जाती मोर्च्याच्या माण तालुकाध्यक्ष पदी उत्तम कामगिरी बजविल्यामुळे सध्या त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली.
निवडीबद्दल आमदार जयकुमार गोरे, शिवाजीराव शिंदे, विलासराव देशमुख, गणेश सत्रे, धनाजी जाधव, अतुल जाधव, अरुण गोरे, ऍड. भास्करराव गुंडगे, सिद्धार्थ गुंडगे,अर्जुन काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.