वाई – वाई तालुक्यात तीन ठिकाणी अवैध व्यवसायांवर छापे टाकून पोलिसांनी तिघांवर कारवाई केली. वाई एमआयडीसीतील चोरगे यांच्या कंपनीसमोर पानपट्टीच्या आडोशाला बेकायदा दारू विकणार्या राजेंद्र विठ्ठल पोतेकर (वय 52, रा. सुलतानपूर, ता. वाई) याच्यावर कारवाई करण्यात आली. वाईतील ब्राह्मणशाहीमधील पी. आर. चौक आणि एमआयडीसीतील चांदणी चौकात बेकायदा जुगार अड्डे चालवल्याप्रकरणी जयवंत वामन गायकवाड (वय 60, रा. गंगापुरी, वाई) आणि अमर सुरेश काळे (वय 35, रा. बोपर्डी, ता. वाई) यांच्यावर कारवाई करण्यात आली.