सातारा : 5 मराठा रॉयल बटालियनचा 224 वा वर्धापनदिन मराठ्यांची राजधानी सातारा शहरात विविध उपक्रमांनी रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
कर्नल विक्रम नलावडे यांचे वडील अॅड. वसंत नलावडे, 5 मराठा रॉयल बटालियन आणि सध्या 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनमध्ये सातारा येथे सेवा बजावणारे सुभेदार मेजर सतीश तपासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुभेदार मेजर व ऑनररी कॅप्टन मारुती मोरे, सेनापदक विजेते हवालदार विक्रम भोसले,
हवालदार योगेश लाड, जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. विविध मान्यवरांनी 5 मराठा रॉयल बटालियनच्या उज्ज्वल इतिहासावर प्रकाश टाकला. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्या सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी दोन मिनिटांचे मौन बाळगण्यात आले.
मराठा स्फूर्तिगीत, राष्ट्रगीत, ‘भारतमाता की जय, ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘5 मराठा रॉयल बटालियनचा विजय असो’ या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.