मावळमध्ये सरपंचपदांची आज, उद्या निवडणूक

आरक्षणामुळे लटकली होती निवड प्रक्रिया

मावळ – न्यायालयीन प्रक्रियेत आरक्षण अडकल्यानंतर मावळ तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणूक होत आहे. आज, बुधवारी (दि. 24) आणि उद्या, गुरुवारी (दि. 25) सरपंचपदाची निवड होणार असून, नागरिकांना प्रतीक्षा संपली आहे.

पुणे जिल्ह्यात निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत 24 व 25 फेब्रुवारी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या संदर्भात सर्व तहसीलदारांना आदेश देऊन सरपंच/उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून अव्वल कारकून, मंडल अधिकाऱ्यांची अथवा समकक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

करोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आल्या. यात जिल्ह्यात सरपंचपदाचे आरक्षण सोडत देखील करण्यात आले होते; परंतु शासनाने नंतर राज्यातील जाहीर झालेली सरपंच आरक्षण रद्द करून निवडणुका झाल्यानंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यास सांगितले. जिल्ह्यात नुकतेच नव्याने सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली, त्यानुसार मावळात बुधवार, गुरुवारी सरपंचपदाच्या निवडणुका होणार आहेत.

मावळ तालुक्‍यातील सरपंचपदाच्या निवडणुकीचा तिढा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी अखेर सोडवला आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला असून, बुधवारी व गुरूवारी फेब्रुवारी रोजी मावळ तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका होणार आहेत.

मावळ तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पाडण्याचे जाहीर केले. गावनिहाय दोन दिवस निवडणूक कार्यक्रम जाहीर देखील केला असून, आता दोन दिवसांत तालुक्‍यातील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मावळ तालुक्‍यातील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज निवडणूक होणारी 29 गावे
नवलाख उंब्रे, माळेगाव बुद्रुक, वेहरगाव, मळवली, कार्ला, तिकोणा, कोथुर्णे, येलघोल, करंजगाव, चिखलसे, टाकवे बुद्रुक, घोणशेत, आढे, सोमाटणे, पाचाणे, परंदवडी, खडकाळा, साते, आपटी, मोरवे, थुगाव, शिवणे, महागाव, उकसान, नाणे, वडेश्‍वर, सांगवडे, आंबी, इंगळून या गावांच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक आज होणार आहे.

उद्या 28 गावे निवडणूक होणारी
ताजे, बऊर, साई, खांड, दारुंब्रे, कुसगाव बुद्रुक, कशाळ, खांडशी, पाटण, वारू, शिवली, मळवंडी ठुले, अजिवली, डाहुली, शिरदे, कुसगाव खुर्द, धामणे, आढले खुर्द, उर्से, गहुंजे, कुसगाव प.मा, कुरवंडे, कांब्रे ना.मा, गोवित्री, येळसे, कुसवली, माळवाडी, आंबेगाव.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.