सगळे सेलिब्रिटीज सार्वजनिक ठिकाणी कसे वागतात, याबाबत त्यांच्या फॅन्सना आकर्षण असते. विशेषतः विमानतळ आणि रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या सेलिब्रिटीजच्या वर्तनकडे सगळ्यांचेच लक्ष असते. अशाच एका प्रसंगामध्ये विमानतळावर स्वतःच्या सामानाची ट्रॉली स्वतःच ढकलत आणणाऱ्या सारा अली खानचे ऋषी कपूरनी कौतुक केले आहे.
लखनौवरून मुंबईला परतत असताना स्वतःच्या बॅगची ट्रॉली स्वतःच ढकलत टॅक्सी स्टॅन्डपर्यंत आणणाऱ्या सारा अली खानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. ते बघून ऋषी क्पूरनी साराचे कौतुक् केले आहे. साराने आपल्या वर्तनाने सगळ्या सेलिब्रिटीजसमोर एक उदाहरण घालून दिले आहे. आपले सामान उचलण्यात काहीही कमीपणा वाटण्याचे कारण नाही.
विमानतळावर नेण्यासाठी-आणण्यासाठी कोणत्याही चमच्याची आवश्यकता नाही. इथे तर काळा गॉगल आणि एअरपोर्ट लुकचीही आवश्यकता नाही. साराने कोणत्याही सुरक्षेशिवाय एकटीने प्रवास करून स्वतःचा आत्मविश्वासच दाखवून दिला आहे, असे ऋषी कपूरनी म्हटले आहे.
साराबाबत इंटरनेटवर आलेले आर्टिकलही ऋषी कपूरनी ट्विटरवर रिट्विट केले आहे. सारा अली खान काही दिवसांपूर्वी कर्तिक आर्यनबरोबर हिमाचल प्रदेशात इम्तियाझ अलीच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी होती.