Sara Ali Khan । बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘योद्धा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहत्यांनाही ट्रेलर खूप आवडला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राची जबरदस्त ॲक्शन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
‘शेरशाह’ या चित्रपटापासून लोक सिद्धार्थ मल्होत्राला सैनिकाच्या भूमिकेत पसंत करत आहे. जरी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नसला तरी हा चित्रपट सिद्धार्थच्या करिअरचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. आता अभिनेता ‘योद्धा’ या चित्रपटातही अशाच भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ सोबत दिशा पटानी आणि राशि खन्ना देखील आहेत. पण या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लोक आणखी एका अभिनेत्रीची दखल घेत आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सारा अली खान आहे.
नुकताच योधा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 1 मिनिट 10 सेकंदाचा एक सीन आहे ज्यामध्ये एक एअर होस्टेस कॉलवर बोलत आहे. त्याचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही आणि फक्त बाजूचा चेहरा दिसतो. पण हा चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून सारा अली खानचा आहे, असे अनेकांचे मत आहे.
चित्रपटात सारा अली खानची सरप्राईज रोल करणार असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटात सारा अली खानचीही भूमिका आहे पण निर्मात्यांनी तिची भूमिका सरप्राईज ठेवली आहे. या भूमिकेत अभिनेत्री एअर होस्टेसच्या गेटअपमध्ये दिसत आहे. सारा चित्रपटात आहे की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा
शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी काठी घेऊन मिरवणुकीत युवकांना केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल