नवी दिल्ली – हरियाणाची डान्सर सपना चौधरी आज देशभरात ओळखली जाते. रियॅलिटी शो “बिग बॉस’मध्ये झळकल्यानंतर तिला खूपच लोकप्रियता मिळाली होती. मनोरंजन क्षेत्रात तब्बल 15 वर्षे काम केल्यानंतरही सपना चौधरीला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळविण्यासाठी स्ट्रगल करावे लागत आहे. अस असतांना पुन्हा एक नवीन संकट तिच्या पुढे उभे राहले आहे.
मिळलेल्या वृत्तानुसार,लखनऊच्या न्यायालयाने डान्सर आणि गायिका सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट जारी केलय. तिच्यावर दाखल झालेला गुन्हा हा सुमारे ४ वर्षे जुना आहे. १४ ऑक्टोबर २०१८ मध्ये लखनऊच्या स्मृती उपवनमध्ये दुपारी 3 ते 10 या वेळेत शो आयोजित केला होता, परंतु सपना शोमध्ये पोहोचली नाही, यामुळे शोला उपस्थित लोकांना वाट बघावी लागली आणि शो साठी प्रेक्षकांकडून प्रति ३०० रुपये घेण्यात आले होते.
त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचे शो चे आयोजक जुनेद अहमद, नवीन शर्मा, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय यांनी सांगितले. या आर्थिक नुकसानीवरून आता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी सपना चौधरी यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे.