नवी दिल्ली – हरियाणाची सुप्रसिद्ध डान्सर आणि गायिका ‘सपना चौधरी’च्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. नवी दिल्लीतील गुरुग्राम भागात ही घटना घडली आहे.
गुरुवारी (27 डिसेंबर) संध्याकाळी सपना शॉपिंग करण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी दिल्लीतील वाटिका चौकाजवळ मागून वेगाने आलेल्या एका गाडीने तिच्या फॉर्च्यूनर गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने सपना चौधरी बचावली आहे.
दरम्यान, सपना चौधरीच्या गाडीला धडक दिलेल्या गाडीचा नंबर किंवा कार चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात सपनाच्या गाडीचे नुकसान झाले आहे. याबाबत तिने अद्याप कोणतेही तक्रारी केलेली नाही. पण जर याबाबत तक्रार आली तर त्या चालकावर नक्कीच कारवाई केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले आहे.