आळंदी – सामाजिक कार्यकर्ते संतोष दीक्षित (वय ५०) यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. दीक्षित हे सीसीपीएल कंपनीत मार्केटींग जनरल मॅनेजर या पदावरती कार्यरत होते. तसेच अनेक सेवाभावी, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.
पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रमुख सल्लागार, नेशर फाउंडेशन, आळंदी जनहित फाउंडेशन या संस्थेचे ते मार्गदर्शक पदाधिकारी होते. त्यांच्या पार्थिवावर आळंदी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता दिक्षीत, दोन भाऊ, एक बहीण, आई, पुतणे असा परिवार आहे.