Lok sabha election 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. आतापर्यंत भाजपने 23 जागांची घोषणा केली आहे. तर शिवसेनेने 8 जागांचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दोन जागा निश्चित केल्या आहेत. अशात शिवसेना शिंदे गट काही जागांवर अडून बसली असल्याचे समजते.
शिवसेना 16 जागांसाठी अडून बसली आहे. जास्त घेऊ पण 16 पेक्षा कमी नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याने महायुतीच्या जागावाटपाची घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. | Lok sabha election 2024
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले, शिवसेना किमान 16 जागांवर लढणारच आहे. आमच्या जागा 16 पेक्षा जास्त असतील कमी नाही, असा दावाच शिरसाट यांनी केला आहे. | Lok sabha election 2024
राष्ट्रवादी शरद पवार गटाने जाहीर केल्या 5 जागा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024) पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे (Amar Kale), दिंडोरी मधून भास्करराव भगरे (Bhaskar Rao Bhagre) तर नीलेश लंके ( Nilesh Lanke) यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.