मुंबई – काही राजकीय व्यक्तींनी राज्यात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची व्यक्त केलेली भीती आणि विशिष्ट समुदायाच्या लोकांकडून झालेले औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उद्दत्तीकरण हा निव्वळ योगायोग असू शकत नाही असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. “अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कोठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल”, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याच्या विधानावर आज माध्यमांशी बोलतात संजय राऊत यांनी जहरी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले,’तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी औरंगजेब लागोतय हे तुमच्या तथातकथित हिंदुत्त्वाचं दुर्दैव आहे, तुमचे गृहखातं फेल आहे. आम्हीही या महाराष्ट्रावर राज्य केल. राज्याच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय याची माहिती आहे, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही सांगूनही तुम्ही काही करत नाही. ‘
संजय राऊत पुढे म्हणाले,’कायदा आणि पोलीस यंत्रणा त्रास देण्याकरता वापरत आहात. तुम्ही गुंडांच्या मुसक्या बांधत नाही आहात, तुम्ही अत्याचारी लोकांना वाचवण्याकरता यंत्रणा वापरत आहात. बाकी तुम्ही काय करताय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.