मुंबई – ‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री सोनाली सेहगल तिचा बॉयफ्रेंड बिझनेसमॅन आशिष सजनानीसोबत विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईमध्ये 7 जून रोजी तिचा विवाह पार पडला. तिने लग्नासाठी खास लुक केला होता. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या खास प्रसंगी अभिनेत्रीने गुलाबी आणि सिल्व्हर रंगाची साडी परिधान केली होती. यासोबतच सोनालीने डोक्यावर ओढणी घेतली आहे. यात तिचा लुक फारच सुंदर दिसत आहे. सोनाली आणि आशिषने गुरुद्वारामध्ये शीख रितीरिवाजांनुसार लग्न केले.
सोनाली सेहगल आणि आशिष एल सजनानी यांच्या लग्नात कुटुंबियांव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्र उपस्थित होते. यावेळी कार्तिक आर्यन आणि मंदिरा बेदीही उपस्थित राहिले होते. याशिवाय सुमोना चक्रवर्ती, शमा सिकंदर, चाहत खन्ना आणि टीव्ही अभिनेता करण व्ही ग्रोवरनेही पत्नीसोबत सोनीलाच्या लग्नाला हजेरी लावली होती.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सोनाली आणि आशिषला काही जण लग्नाच्या शुभेच्छा देत आहे. तर दुसरीकडे त्यांना ट्रोलही केले जात आहे. ‘बाप-लेकीची जोडी दिसते,’ ‘मला वाटले तिच्या वडिलांसोबत उभी राहिली आहे,’ अशा कमेन्ट नेटकरी करत आहेत.
दरम्यान, आशिष हा एक उद्योजक आहे. त्याचे अनेक हॉटेल आहेत. तर अभिनेत्री सोनालीने 2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘प्यार का पंचनामा 2’ मध्येही दिसली होती.