बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आपली पत्नी मान्यता आणि जुळी मुले शहरान आणि इकरा यांना भेटून तब्बल दोन महिने झाले आहेत. करोनाचा कहर वाढत असल्याने देशभरात लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वीच मान्यता आपल्या मुलांसह दुबईला गेली होती आणि तेव्हापासून ती तिथेच आहे. संजय दत्तने इंस्टाग्रामवर नुकताच एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पत्नी आणि मुलांसह हसताना दिसत आहे.
View this post on Instagram
I miss them so much❤️ To everyone who is with their families right now, cherish them!
हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला त्यांची खूप आठवण येत आहे. या क्षणी जे लोक आपल्या कुटुंबासमवेत आहेत, त्यांनी या क्षणाचा आनंद घ्यावा. यावर अनेक रेड हार्ट इमोजींनी पोस्ट करत मान्यताने त्याला रिप्लाय दिला आहे. संजय दत्तने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी हा फोटो रि-पोस्ट करत त्याला लाखोंच्या संख्येने लाईकस् केल्या आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास संजय दत्त लवकरच “केजीएफ : चॅप्टर 1’च्या सिक्वेलमध्ये मुख्य खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडनसुद्धा महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.