चिंबळी – कुरूळी (ता. खेड) येथे करोनाचा संसर्ग वाढत असल्याने युवा कार्यकर्ते मयूर सोनवणे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून स्व खर्चाने गावात सॅनिटायझर फवारणी केली. तसेच नागरिकांना व्हिटॅमिनच्या गोळ्या वाटप केल्या. या उपक्रमात संत तुकाराम सहकारी साखर कारखानाच्या संचालिका ताराबाई सोनवणे, गुलाबराव सोनवणे, विशाल सोनवणे सहभागी झाले होते. गावातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे व त्यांना बाधा होवू नये म्हणून ही फवारणी करण्यात आली, अशी माहिती मयूर सोनवणे यांनी दिली.