मुंबई – मागील काही दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. समीर वानखेडेचे वडिल ज्ञानदेव वानखेडे मुस्लीम असून त्यांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. त्याला ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात आव्हान दिलं आहे.
नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर वानखेडे कुटुंबांने न्यायालयात धाव घेतली. यावर सुनावणी सुरू आहे. तत्पूर्वी ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात २० पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं.
या प्रतिज्ञापत्रात ज्ञानदेव वानखेडे यांनी सर्व कागदपत्र सादर केले. त्यात त्यांनी सांगितलं की, आपण हिंदू महार आहोत. माझी माझी पत्नी झाईदा ही मुस्लिम होती. पण आम्ही हिंदू पद्धतीने विवाह केला.
दरम्यान ज्ञानदेव वानखेडे यांनी आपलं पॅन कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड, शाळेची मार्कलिस्ट, पोलिस सेवेत असतानाची कागदपत्र दाखल केली. तर त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मलिक यांच्याकडून करण्यात आलेली सर्व ट्विट वाचून दाखवली.