मुंबई – अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्याचे महत्वाचे कारण दोघांनी 4 वर्षानंतर घेतलेला घटस्फोट. अलिकडेच दोघांनी लग्नाच्या 4 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला. दरम्यान घटस्फोटानंतर हे दोघे पुन्हा एकत्र येणाच्या चर्चा रंगल्या आहेत.
समंथा-नागा चैतन्य पुन्हा एकत्र येणार मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यात नाही तर या दोघांना एक मोठा सिनेमा ऑफर झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे हे दोघे सिनेमात एकत्र दिसणार आहेत. फिल्म मेकर नंदिनी रेड्डी आपल्या आगामी सिनेमात समंथा आणि नागा चैतन्यला डेट करणार असल्याची चर्चा रंगत आहे. दोघे 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘ओह बेबी’ सिनेमात दिसले. आता नंदिनी रेड्डी घटस्फोटानंतर पुन्हा दोघांना सिनेमाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. नंदिनी रेड्डी समंथाच्या खूप जवळ असल्याचे टॉलिवूडच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.