मुंबई – नोरा फतेही आणि अक्षय कुमार अभिनेत्री मौनी रॉय, सोनम बाजवा, दिशा पटानी आणि अपारशक्ती खुराना हे सर्व स्टार्स सध्या द एंटरटेनर्स टूरसाठी यूएसमध्ये आहेत. हे सर्व कलाकार वेगवेगळ्या शहरात पपरफॉर्म करणार आहेत. अलीकडेच, अटलांटा येथील पहिल्या शोमध्ये अक्षय आणि नोरा यांनी त्यांचे बॅक टू बॅक डान्स परफॉर्मन्स सादर केले. याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नोरा आणि अक्षयच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नोरा आणि अक्षय साऊथ स्टार अल्लू अर्जुनसह समंथा रुथ प्रभू यांच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील हिट गाण्यावर नाचताना दिसत आहेत. अक्षय आणि नोराचा हा डान्स फॅन्सला मात्र चांगलाच खटकला आहे.
व्हिडिओमध्ये, अक्षय कुमारने काळा आणि लाल शर्ट घातलेला दिसतो, तर नोराने समंथासारखा लाल ड्रेस घातला होता. डान्स करताना अक्षयने अल्लू अर्जुनचा लुक तसेच स्टाईल कॉपी केली. दोघांनीही या गाण्यावर उत्साहाने डान्स केला. विशेष म्हणजे दोघेही अल्लू अर्जुन आणि समंथाच्या स्टेप्स फॉलो करताना दिसले, पण युजर्सना ते आवडले नाही आणि त्यांनी ट्रोलिंग सुरु केले.
View this post on Instagram
अक्षयने आणि नोराने अल्लू समंथाला कॉपी केल्याने फॅन्स चांगलेच भडकले. काहीतरी ओरिजिनल कर..’ असा सल्ला एका युजरने अक्षय कुमारला कमेंट करून दिला आहे. तर दुसऱ्या एकाने थेट नोराला टार्गेट केले आहे. तू कधीच समंथा नाही होऊ शकत अशी कमेंट एकाने केली आहे. एकंदरीतच साऊथ गाण्यासह डान्स स्टेप्स कॉपी केलेलं प्रेक्षकांना फारस रुचलेलं दिसत नाही.