पिंपरी, (प्रतिनिधी) – नेहरूनगर पिंपरी न्यायालयात पिंपरी चिंचवड ॲडव्होकट्स बार असोसिएशनच्या वतीने तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच वकिल बार रूमधील महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महारांजाच्या नावाचा जयघोष करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. जिजाबा काळभोर, ॲड. दिनकर लाळगे पाटील, ॲड. मकरंद गोखले, ॲड. अनिल डांगे, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड.विवेक महामुनी,ॲड.निलेश जाधव,ॲड.अनिल शिंदे,ॲड.सनी काटे,ॲड.अक्षय भालेराव,
ॲड.विकास शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकट्स बार असोसिएशनचे सचिव ॲड.धनंजय कोकणे व सहसचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले.