मुंबई – सध्या IIFA अवॉर्ड्स 2022 (IIFA 2022) ची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशलवर व्हायरल होत आहेत. सध्या यातील एक व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणजेच सलमान खान आज लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतो. पण, एक काळ असा होता जेव्हा त्याच्याकडे शर्ट आणि जीन्स दोन्ही घेण्यासाठी पैसे नव्हते. आयफा अवॉर्ड्स 2022 मध्ये त्याने हाच किस्सा सांगितलं आहे. यावेळी तो भावुक झाला होता. सलमानचा हा विडिओ सोशलवर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेता रितेश देशमुख , अभिनेता मनीष पॉलसोबत सलमान होस्टच्या भूमिकेत दिसला. या दरम्यान त्याला ओलसर डोळ्यांनी ते दिवस आठवले जेव्हा त्याच्याकडे शर्ट आणि जीन्स दोन्ही एकत्र खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते.
शर्ट आणि जीन्स एकत्र घ्यायला पैसे नव्हते
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना सलमान खान म्हणाला, ‘एक काळ असा होता जेव्हा माझ्याकडे इतके पैसे नव्हते. माझ्याकडे फक्त शर्ट किंवा जीन्स विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे नसायचे. ‘अण्णा’ म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टीचे मिसचीफ नावाचे दुकान होते. मीत्याचा या दुकानात गेलो तेव्हा माझी नजर स्टोन वॉश जीन्स, शर्ट, शूज आणि पर्सवर पडली. माझ्याकडे इतके पैसे नसल्यामुळे मी ते सर्व एकाच वेळी विकत घेऊ शकत नाही हे अण्णाला कळले.
मी त्यावेळी एकच जीन्स विकत घेतली तेव्हा अण्णाने मला एक शर्ट भेट दिला. आणि पुढे या घटनेचे वर्णन करताना सलमान खान भावूक झाला. तेव्हा सुनील शेट्टीचा मुलगा अहानने उठून त्याला मिठी मारली. पुढे सलमानने सांगितले की, काही दिवसांनंतर जेव्हा अण्णा मला त्याच्या घरी घेऊन गेले त्यावेळी त्याने मला तेच पाकीट भेट दिले जे मला आवडले.’ हा किस्सा सांगताना सलमानला अश्रू अनावर झाले.