कोल्हापूर – सहा जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून राज्यातील सर्व ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येथे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भगवी शिवस्वराज्य गुढी उभारणीचा कार्यक्रम मोठ्या पार पडला. जिल्हा परिषदेच्या कागलकर हाऊसच्या प्रांगणात यावेळी जणू शिवशाहीचा अवतरली होती.
यावेळी मर्दानी खेळ सादर करण्यात आले.. तर छत्रपतींचं कार्य शाहिरी पोवाडेंच्या माध्यमातून सांगण्यात आलं. तर अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या वेशात या ठिकाणी दाखल झाले होते. त्यामुळं या कार्यक्रमाला मोठी शोभा निर्माण झाली होती. दरम्यान यावेळी बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून ला होतो तो राज्यभर शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा होतोय.
यामध्ये राज्यातील 34 हजार ग्रामपंचायती, 532 पेक्षा जास्त पंचायत समित्या आणि 34 जिल्हा परिषदामध्ये भगवी गुढी उभी करून शिव स्वराज्य दिन साजरा करायचा आणि छत्रपती शिवाजी महाराज याचं नामस्मरण करायचं असा संकल्प केला होता. मात्र दोन वर्ष कुरणाच्या संकटामुळे उत्साहात आपण कार्यक्रम करू शकलो नाही. मात्र आता कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा आपण मोठ्या उत्साहात ग्रामविकास विभागाच्या आदेशाप्रमाणे कोल्हापुरात हा दिवस मोठ्या जत्साहात साजरा केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नामस्मरण करण्याचा आज दिवस असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे..