मुंबई – भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ हजार ९३३ वर पोहचला आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे.
View this post on Instagram
मात्र लॉकडाउन असतांना सुद्धा शिस्त न पाळता लोकांनाकडून लॉक डाउन तसेच संचार बंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे . देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ रुग्णसेवेसाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. अशातच काही जणांना डॉक्टरांवर हल्ले केले. शिवीगाळ केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाला. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने इंस्टाग्रामवर व्हिडियो शेअर करत फॅन्स ला मोलाचा संदेश दिला आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून याच व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.