मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईभोवती सध्या कोरोनाचे काळे ढग गडद होताना दिसतायेत. शहरामध्ये सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या १६२ वर पोहचली असून पाच हजारांपेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेतर्फे शहरातील १९१ ठिकाणांना ‘कंटेनमेंट क्षेत्रं’ म्हणून घोषित करण्यात आलंय. महापालिकेतर्फे या भागांमधील नागरिकांना आपल्या घरामध्येच क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले असून येण्या-जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आलेत.
191 areas in various locations of #Mumbai have been marked as ‘Containment Areas’, where #COVID19 positive patients are confirmed. Entry/exit is restricted for all such areas&residents of the area are instructed to remain home quarantined: Brihanmumbai Municipal Corporation(BMC) pic.twitter.com/YriCifqGSr
— ANI (@ANI) April 1, 2020