इस्लामाबाद ( Salaries of government employees stopped in pakistan ) – आर्थिक विपन्नावस्थेकडे वाटचाल करत असलेल्या पाकिस्तानमध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याची वेळ आली आहे. अर्थमंत्री इशाक दर यांनी याबाबतचे आदेश अकाउंटंट जनरल ऑफ पाकिस्तान रेव्हेन्यूला दिले आहेत.
सर्व राष्ट्रीय कर्मचारी, सर्व मंत्री, आणि अन्य कर्मचाऱ्यांचेही पगार रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्यात यावेत, असे या आदेशात म्हटले असल्याचे समजते आहे.
मात्र अर्थ मंत्र्यांकडून या संदर्भात कोणतेही स्पष्टिकरण अथवा समर्थन देम्यात आलेले नाही.
पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी कठोर काटकसरीच्या उपाय योजनांची अंमलबजावणी केल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. इंधन आणि वीजेवर नव्याने कर लागू करण्यात आले आहेत. याबरोबर श्रीमंतांवर नव्याने कर लावण्याच्या प्रस्तावांचाही विचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे.