आदित्य मोडक
मॉडर्न मार्केटिंगला सुरुवात होण्यापूर्वीही उत्पादनांचं मार्केटिंग पारंपरिक होते. त्यांची माध्यमं व स्वरूप भिन्न होती. गेल्या सहा पिढ्यांपासून दागिने व्यवसायात असणाऱ्या पु. ना. गाडगीळ आणि सन्स अर्थात पीएनजी सन्सनं भविष्याची गरज ओळखून आपल्या ब्रँडचं मार्केटिंग सुरुवातीपासून केलं आहे. हे करताना व्यवसायाच्या पंचसूत्रांना (सचोटी, प्रामाणिकता, पारदर्शिता, गुणवत्ता व सेवा) बाधा येणार नाही याकडे लक्ष दिले. त्यामुळेच सुमारे दोनशे वर्षांच्या वाटचालीत एका सराफी कुटुंबाचे नावाच त्यांची ओळख बनून सराफी क्षेत्रातील आघाडीच्या ब्रँडमध्ये त्याचे रूपांतर झाले आहे. २१ व्या शतकात रिटेल मॉडर्न होत असल्याने पीएनजी सन्सचं मार्केटिंग काळानुसार बदलल आहे. मात्र, परंपरेशी नाळ कायम आहे. ग्राहक त्याचा गाभा आहे.
सामान्य माणसांतील हीरे
हिऱ्यासारखी माणसं हे कॅम्पेन पीएनजी सन्सच्या परंपरेला अनुसरून असणारं कॅम्पेन. यात जनसामान्यांमधील असामान्य कामगिरी व माणुसकीचं दर्शन घडविणाऱ्यांचे प्रतिबिंब आहे. या कॅम्पेनला नाव हिऱ्यासारखी माणसं देताना समाजातले हीरे शोधले गेले. या कॅम्पेनमध्ये सहा शॉर्ट फिल्म असून, एकही संवाद नसतानाही हिऱ्यासारखी माणसं कॅम्पेन लोकांमध्ये घर केलं आहे. काही कोटी लोकांनी हे कॅम्पेन पाहिलं आहे. याच कॅम्पेनला मार्केटिंगचे राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कारही मिळाले आहेत.
बोलीभाषेचं प्रतिबिंब
आपण आधुनिक, डिजिटल, बहुभाषिक होत असलो तरी मातृभाषेतून व्यक्त होण्याचं समाधान वेगळं असतं. त्यामुळचं गावानुसार पाणी बदलणाऱ्या महाराष्ट्रात मराठीच्या अनेक बोली आहेत. पीएनजी सन्सनं बोलीतून भावना व्यक्त करणारं कॅम्पेन काही महिन्यांपूर्वी केलं. यात पुणे (प्रत्येकासाठी परफेक्ट), नाशिक (गागाट ना, गागाट), सोलापूर (जशी तुझ्या हातची शेंगची चटणी गं) येथील प्रदेशांचा मराठीवरील प्रभाव, भाषेतून व्यक्त होणारा गोडवा मांडला आहे. या कॅम्पनेची दखल विविध कम्युनिटीजनी घेतली आहे.
मॉडर्न झलक
क्रिकेटवरचं भारतीयांच प्रेम सर्वांना माहितीचं आहे. बायकोबरोबर खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाच्या डोक्यात क्रिकेट किती असू शकत यावरच एक शॉर्ट फिल्म पीएनजी सन्सनी केलीय. त्याचं वर्णन क्रिकेटच्या कॉमेंट्रीच्या स्वरूपात केलंय. हे कॅम्पेन काही लाख लोकांनी सोशल मीडियावर पाहिलं आणि गेल्या वर्षी आयपीएलला ते प्रदर्शित झालं. प्रत्येक वयोगटाचं प्रतिबिंब मार्केटिंगमध्ये परंपरा न सोडता उमटलं पाहिजे, हे यातून कळत. पीएनजी सन्सचं नवीन कॅम्पेन बदलणाऱ्या मराठी माणसाचं प्रवास उलगडणारं आहे. परदेशात असलेल्या एक मराठी मुलाचं प्रेयसीला आधुनिक पद्धतीने केललं प्रणय निवेदन यात आहे. लाँग डिस्टन्स रिलेनशिपवर आधारित हे कॅम्पेनचं शूट ब्रिटनमध्ये झालयं. महाराष्ट्रातल्या सराफी ब्रँडने परदेशात टीव्हीसी शूट करण्याचं हे पहिल उदाहरण आहे.
कारागिरांचा सन्मान
संस्कृतीचं प्रतिबिबं दागिन्यांत असतं आणि आपल्या देशाला दागिन्यांचा मोठा इतिहास आहे. हा वारसा जपलेल्या कारागिरांच्या अनेक पिढ्यांना धन्यवाद देणारी शॉर्ट फिल्म पीएनजी सन्सनं केलीय. दागिने प्रथम कला व मग व्यवसाय, असं मानणारे पीएनजी सन्स आहेत. त्यामुळेच कारागिरांना समर्पित अशी शॉर्टफिल्म पीएनजी सन्सनी केलीय. अशी ही परंपरा, संस्कृती यांना जोडणारी पीएनजी सन्स कंपनी पारंपरिक तितकीच मार्केटिंगमध्ये कॉन्टेंपररी आहे.
माध्यम व समाजाशी बांधीलकी
कोव्हिड १९ मध्ये लॉकडाउन लागलं. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. खर्च करणं कंपन्या टाळत होत्या. पण, पण, कोव्हिडच्या काळात सामाजिक बांधीलकीच्या नात्यानं माध्यमांना पाठबळ देण्यासाठी पीएनजी सन्सनं ग्राहकांशी जाहिरातीतून सामाजिक संदेश देत संवाद ठेवला. कोव्हिड १९ मुळं शिक्षकांना ऑनलाइनवरून मुलांना शिक्षण द्याव लागलं. पण, मुलांसाठी व शिक्षकांसाठी तसं आव्हानात्मक कार्य असतानाही त्यांनी ते लीलया पेललं. अशाच शिक्षकांच्या कार्याचं कौतुक व त्यांना धन्यवाद देण्यासाठी शाळा ही शॉर्ट फिल्म पीएनजी सन्सनं केली. एका ब्रँड शिक्षकांसाठी आभार व्यक्त करणारी फिल्म करण, हे मार्केटिंग क्षेत्रासाठी वेगळं होतं. समाजाशी बांधील राहणं व वेळप्रसंगी आपली कृतज्ञता व्यक्त करण, हे पीएनजी सन्सच्या परंपरेतच आहे. त्यामुळंच अशी शॉर्ट फिल्म त्यांनी केवळ शिक्षकांवर केली. लॉकडाउन उठल्यावर लोकांमध्ये सकारात्मक भावना कायम राहण्यासाठी विविध सेलिब्रेटिंशी संवाद साधून त्यांचे अनुभव शेअर केले. या प्रत्येक कॅम्पेनमधून ग्राहक, समाज, सेवा, गुणवत्ता, पारदर्शिता यांनाच महत्त्व आहे, हे पीएनजी सन्सनं मांडल असून, मॉर्डन मार्केटिंगच्या काळात परंपरेला धरून कॉन्टेम्पररी मार्केटिंग केल आहे.
(लेखक पीएनजी सन्सचे मार्केटिंग प्रमुख आहेत.)