मोशी – सर्व संतांची पुण्यतिथी सर्व समाजाने एकत्र साजरी करणे या उपक्रमांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये श्री संत सोपान काका महाराज यांचा समाधी सोहळा, श्री संत जगनाडे महाराज व श्री संत कान्होराज महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हभप रामचंद्र महाराज यांचे किर्तन आयोजन केले होते.
वारकरी सेवा संघ व ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व संतांच्या पुण्यतिथी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज विनामंडपामध्ये साजरी केली जाते. त्या अनुषंगाने प्रत्येक संतांची पुण्यतिथी वेगवेगळ्या मंडळाला वेगवेगळ्या दिंड्यांना सामावून घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले जाते.
त्यानिमित्ताने श्री संत सोपान काका, श्री संत जगनाडे महाराज व श्री संत कान्होराज महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम वै. बाळकृष्ण महाराज फणसे दिंडी क्रमांक 88 वेल्हे तालुका यांच्या सहकार्याने कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील मुले यांनी साथ सांगत केली.
प्रमुख उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार, श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे उपस्थित होत. रवींद्र कुमकर, तानाजी शिंदे, मोहन शिळीमकर, मारुती वालगुडे, नारायण रेणुसे उपस्थित होते.