बॉलीवूड स्पोर्टस बायोपिक “सायना’चा डिजिटल प्रीमियरची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणिती चोप्रा मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट भारताची फुलराणी अर्थात सायना नेहवालवर आधारित आहे.
हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरबाबत परिणिती म्हणाले, हा चित्रपट वैश्विक डिजिटल प्रीमियरवर प्रदर्शित होत असल्याने मी खूपच उत्साहित आहे.
ही जगभरातील चाहत्यांसाठी एक प्रेरणादायक कथा आहे. हा चित्रपट करताना मी अनेक गोष्टी शिकले. एक कलाकार म्हणून ही भूमिका आव्हानात्मक होती, असे तिने सांगितले.
दरम्यान, “सायना’ चित्रपटाकडून परिणितीला खूप आशा आहे. तसेच परिणितीचे चाहतेदेखील चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याने त्याला किती यश मिळते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.