मनसेने काढला उद्धव ठाकरेंना चिमटा म्हणाले,याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”

शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू

मुंबई – राज्यात वाढता कोरोनाचा वाढता कहर पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. ह्या पत्रात राजसाहेबांनी लसीकरणासोबत इतर आरोग्यविषयक बाबींवर अतिशय मोलाच्या सूचना केल्या . राज ठाकरेंनी केंद्र सरकारकडे महत्वाचे मुद्यावर मागण्या केल्या होत्या. हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी, ह्या  विनंतीला  केंद्र सरकारने  मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे त्यांनी  मनापासून आभार मानले.

यातच शिवसेना आणि मनसेत वादाची लढाई सुरू झाली आहे.  मागण्या मान्य झाल्यामुळे मनसेने याचं श्रेय घेतलं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे

 

काय म्हणाले संदीप देशपांडे 

‘राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंग ला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”.करोना काळात “राजकारण” नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.