पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – साईबालाजी एज्युकेशन सोसायटीतर्फे वार्षिक इंटर-कॉलेजिएट टेक्नो-मॅनेजमेंट कल्चरल फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा दि. १८ ते २४ फेब्रुवारी या कालवधीत पार पडली.
गेल्या 12 वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या उत्सवात नेहमीच उत्कृष्टता, नावीन्यपूर्णता आणि तरुणांच्या उत्साहाचा संगम अनुभवायला मिळातो. यंदाही क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा तीन मुख्य विभागांमध्ये 50 हून अधिक उत्कृष्ट कार्यक्रमांचा समावेश असलेला हा फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यंदा ऍथलेटिसिझमवर असलेला भर असलेल्या ड्युएथलॉन या स्पर्धेपासून सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत धावणे, सायकल चालवणे आणि पुन्हा धावणे अशा तीन टप्प्यांचा समावेश होता आणि हे सर्व टप्पे ऑलिम्पिक अंतराचे होते. या वेळी स्पर्धांमध्ये भारतातील नामांकित महाविद्यालयातील १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेतील सहभाग आणि यशस्वी आयोजनाबद्दल साईबालाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनीष मुंदडा यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले, तसेच भविष्यातही अशाच उत्कृष्ट कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे तरुणांमधील प्रतिभा आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.