IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची बॅट आयपीएलच्या 15 व्या मोसमात अजूनही शांत आहे. गायकवाड सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरला आहे. शनिवारी (9 एप्रिल) मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तो 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने त्याला बोल्ड केले.
गायकवाडची कामगिरी पाहता कोलकाता नाईट रायडर्सच्या विरूद्ध चार बाॅलमध्ये खातेही उघडता आले नाही. यानंतर त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध चार बाॅलमध्ये एक धाव काढली. पंजाब किंग्जविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याला चार बाॅलमध्ये केवळ एक धाव करता आली. आता हैदराबादविरुद्ध 16 धावांवर बाद झाला. अशा प्रकारे त्याने चार सामन्यांमध्ये एकूण 25 बाॅलमध्ये केवळ 18 धावा केल्या.
https://twitter.com/mohitherapy/status/1512743573535748101
भारतीय भूमीवर आणि UAE मधील गायकवाड यांची कामगिरी पाहिली तर त्यात जमीन-आसमानाचा फरक आहे. गायकवाडने भारतात 12 डावात 214 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी 19.45 इतकी आहे. त्याने 120.90 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. गायकवाडने भारतात दोन अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी, जर तुम्ही यूएईमधील त्याचे आकडे पाहिले तर तो खूपच चांगला खेळलेला दिसतो.
UAE मध्ये ऋतुराजने IPL च्या सामन्यात 643 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 58.45 आणि स्ट्राइक रेट 133.12 होता. ऋतुराजने यूएईमध्ये पाच अर्धशतके झळकावली आहेत. त्याचा एकूण रेकॉर्ड पाहता त्याने 26 सामन्यांच्या 26 डावात 38.95 च्या सरासरीने 857 धावा केल्या आहेत. यादरम्यान ऋतुराजचा स्ट्राइक रेट 129.85 राहिला आहे. त्याने एक शतक आणि सात अर्धशतके झळकावली आहेत. त्याने गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सविरुद्ध अबुधाबीमध्ये 101 धावा केल्या होत्या.
गायकवाड यांच्याशिवाय त्याचा सहकारी रॉबिन उथप्पाही सनरायझर्सविरुद्ध चांगला खेळला नाही. त्याने 11 चेंडूत 15 धावा केल्या. मोईन अलीने 35 चेंडूत 48 धावा केल्या. अंबाती रायडूने 27 धावा केल्या. कर्णधार रवींद्र जडेजाने 23 धावा केल्या. शिवम दुबे आणि महेंद्रसिंग धोनी प्रत्येकी तीनच धावा करू शकले.