मुंबई – आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अटकेच्या भीतीने अंडरग्राऊंड झाले असून ते व त्यांचा मुलगा नील हे सध्या अटकपुर्व जामीनासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय संजय राऊत यांनी आज केला.
तुम्ही काही चूक केली नसेल तर कशाला घाबरता?” असा सवालही संजय राऊत यांनी सोमय्या पितापुत्रांना केला आहे. ते म्हणाले की सोमय्या यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही जारी केली आहे. पोलिस त्यांना समन्स बजावण्यासाठी गेले होते. पण त्यांच्या मुलुंड पूर्वेकडील घराला कुलूप होते,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.
विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी सोमय्या यांनी 57 कोटी रूपये लोकांकडून जमवले आणि ते पैसे त्यांनी स्वत:च हडप केले असा आरोप केला जात आहे. हा पैसा काय केला हे सांगण्यास सोमय्या हे सतत टाळाटाळ करीत आहेत. किती पैसा जमवला आणि तो कोठे ठेवला या प्रश्नाची सोमय्या यांनी उत्तरे द्यावीत अशी मागणी राऊत हे सातत्याने करीत आहेत.