मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन सध्या गंभीर आजारी आहेत युक्रेनच्या आघाडीवर रशियाला अद्याप न मिळालेल्या यशाचाच हा परिणाम आहे, असे ब्रिटनच्या माजी गुप्तचर प्रमुखाने ही माहिती दिली आहे. हे आजारपण नक्की कोणत्या स्वरुपाचे आहे, हे समजू शकलेले नाही.
हा आजार नक्की बरा होऊ शकणारा आहे की नाही, हे देखील समजू शकलेले नाही. पण ते काही असले तरी या विषयाचा गांभीर्याने विचार करायला लागणार आहे, असे ख्रिस्तोफर स्टीली या माजी ब्रिटीश गुप्तचर प्रमुखाने म्हटले आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भात स्टीली यांनी महत्वाची कागदपत्रे तयार केली होती. 2016 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने थेट हस्तक्षेप केला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान पुतीन यांच्या एका निकवर्तीयाने देखील पुतीन यांच्या आजोरपणाविषयी सूचक वक्तव्य केले आहे. पुतीन यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाला म्हणावे तसे यश न मिळाल्यापासूनच पुतीन यांच्या आजारपणाविषयीची चर्चा सुरू झाली आहे.