ऋषी कपूरना रशियन फॅनची अखोखी भेट

ऋषी कपूर केवळ भारतात्च नव्हे तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. याचा एक भन्नाट पुरावा मिळाला आहे. अलिकडेच ऋषी कपूर हेअर कट करण्यासाठी सलूनमध्ये गेले होते. तेंव्हा तिथे असलेल्या एका रशियन फॅननी त्यांना ओळखले. एवढेच नव्हे तर त्या फॅनने आपली नोटबुक बाहेर काढली आणि ऋषी कपूर यांच्या हिरो म्हणून पदार्पणाच्या “बॉबी’ मधील “मै शायर तो नही…’ हे गाणे म्हणूनही दाखवले.

ऋषी कपूरना या रशियन फॅनला भेटून इतका आनंद झाला की त्यांनी या गाण्याचा एक व्हिडीओ स्वतः शूट केला आणि तो ट्विटरवर शेअर देखील केला. उपचारासाठी इंग्लंडला गेलेल्या ऋषी कपूरना आता मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. ते उपचारासाठी परदेशात जाऊन आता दोन वर्षे पूर्ण उलटून गेली आहेत.

या दोन वर्षाच्या काळात अख्खे बॉलिवूड त्यांना भेटायला येऊन गेले. त्या सर्वांनी ऋषी कपूरना “गेट वेल सून’ अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

अलिकडेच न्यूयॉर्कमध्ये अनुपम खेर यांच्या “लेसन्स लाईफ टॉट मी अननोईंग्ली’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभालाही ऋषी कपूर यांनी हजेरी लावली होती. आता जितक्‍या लवकर भारतात येत येईल तितक्‍य लव्कर परतायची त्यांची घाई सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.