दीपिका पदुकोणकडे गुड न्यूज …?

इन्स्टाग्रामवर रणवीरबरोबरच्या एका चॅट दरम्यान दीपिकाने एक भन्नाट कॉमेंट केली आहे. रणवीरच्या फोटोला हाय इमोजी आणि स्माईली इमोजी पोस्ट करून दीपिकाने “हाय डॅडी’ असे म्हटले आहे. या कॉमेंटमधून दीपिकाला काय म्हणायचे होते, ते समजले नाही. मात्र तिच्या फॅन्सना मात्र तिच्याबाबत वेगळीच शंका आली आहे.

दीपिकाकडे काही तरी “गुड न्यूज’ आहे, असा अंदाज फॅन्सनी वर्तवायला सुरुवात केली आहे. या कॉमेंटवर अन्य लोकांच्या ज्या कॉमेंट पडल्या आहेत, त्यात अर्जुन कपूरचीही एक कॉमेंट आहे. त्याने रणवीरला उद्देशून “बाबा, भाभी तुम्हाला एक … देणार आहे.’ असे म्हटले आहे.

अर्जुनच्या या सूचक कॉमेटवरून तर फॅन्सनी दीपिकाकडे गुड न्यूज आहे, ही बातमी अक्षरशः दवंडी पिटवल्याप्रमाणे पसरवायला सुरुवात केली. दीपिकानेच स्वतःच्या कॉमेंटमधून आपल्या प्रेग्नन्सीची खबर रणवीरला कलवली आहे, असा तर्कही काढला जाऊ लागला.

या वर्षाच्या सुरुवातीला कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या दीपिकाबाबत तेंव्हाही असाच तर्क काढला जाऊ लागला होता. कारण आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांबरोबर बोलताना दीपिकाने मातृत्वाबाबत चर्चा केली होती. आता इन्स्टाग्रामवर रणवीरबरोबरचे चॅट सेशन आता हटवण्यात आला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.