मुंबई – ‘रोहित शेट्टी’चा चित्रपट म्हंटल की डोळ्यासमोर उभी राहते गाड्यांची तोडफोड, हिरो व्हिलनची मारधाड आणि बरच काही. सिंघम, गोलमाल अशा सुपरहिट चित्रपटांची माळ लावल्यानंतर आता रोहित शेट्टी एक धमाकेदार वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ज्याचं नाव आहे ‘इंडियन पोलीस फोर्स’. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या मुख्य भूमिक आहेत. ही सीरिज ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत या सीरिजचं शूटिंग पार पडलं.
दरम्यान, याच वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान रोहित शेट्टी गंभीर जखमी झाला आहे. ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सीरिजचे शूटिंग करताना हा अपघात घडला. कार चेससंदर्भातील शॉट शूट करताना रोहितच्या हाताला दुखापत झाली. हैदराबादमध्ये हे शूटिंग सुरू आहे. मात्र, या दुखापतीवर तातडीने उपचार करण्यात आले आणि घटनेच्या काही वेळानंतर शूटिंगला पुन्हा सुरुवात झाली’. अशी माहिती रोहितच्या टीमकडून देण्यात आली.
दरम्यान, ही वेब सिरीज रोहित शेट्टीचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये गाड्यांची तोडफोड, हिरो व्हिलनची मारधाड आणि बरच काही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मात्र, या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.