रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला “सिंबा’ हा चित्रपट रणवीर सिंह याच्या करियरमधील हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने न केवळ रणवीरची एक नायक म्हणून ओळख निर्माण केली आणि पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतही त्याची धमाकेदार एंट्री करून दिली.
तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 240 कोटींचा गल्लाही जमविला. यानंतर पुन्हा एकदा रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी एकत्रित काम करणार असल्याचे समजते.
हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. रोहितने लॉकडाऊनमध्ये या स्क्रिप्टवर काम केले आहे. याबाबत त्याने रणवीरशी चर्चाही केली असून रणवीर या चित्रपटासाठी उत्सुक आहे.
गोलमाल फ्रेंचायझी आणि पोलीस युनिव्हर्समधून बाहेर येऊन रोहित शेट्टी काहीतरी वेगळे करू इच्छित आहे. लॉकडाऊनमध्ये त्याला आउट-अँड कॉमेडी स्क्रिप्टवर काम करण्याची संधी मिळली.
जेव्हा त्याने रणवीर सिंह यांच्यासमवेत ही कल्पना सामायिक केली तेव्हा रणवीरनेही त्याला होकार दर्शविला. दरम्यान, रणवीरने होकार दर्शविल्यानंतर रोहितसह संपूर्ण टीम दिवसरात्र काम करत आहे.