मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून रियाची चौकशी सुरू होती.
यातच,इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीने केलेल्या कारवाईपूर्वी झालेल्या चौकशीमध्ये रियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला होती. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) चौकशी करीत असलेल्या या ड्रग संदर्भातील चॅटिंगमधून बॉलिवूडमधील पाच टॉपच्या कलाकारांच्या नावांची अद्याक्षरं समोर आली आहेत.
मिळालेल्या नुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K हा कोडवर्ड समोर आला होता. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये या नावांचा उलगडा झाला आहे. त्यानुसार D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याच्या पत्नीचं म्हणजेच अभिनेत्री नम्रता शिरोडकरचं नाव समोर आलं आहे. तर S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा ही नावं समोर आली आहेत.
दरम्यान,याच प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत कौर यांना या आठवड्यात चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात बोलावलं जाऊ शकतं.