Rohit Pawar on Ajit Pawar। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून काल शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आज रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. बारामतीमध्ये माझ्या कुटुंबीयांशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करणार नाहीत, असं वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिले. दादा असे भावनिक आव्हान करतील असं वाटलं नव्हतं असं ते म्हणाले.
आळंदीमध्ये सुधीर मुंगसे या कार्यकर्त्यांना भेटायला आले असता ते बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांना अनेक पदं मिळाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता. आता ते भाजपबरोबर गेलेत ते पदासाठीच का ? असा प्रश्न उपस्थित होतोय असे ते म्हणाले बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर बोलताना जेव्हा त्याची अधिकृत घोषणा होईल, त्यानंतर आम्ही प्रचार सुरू करू, असे ते म्हणाले.
बारामतीकरांना भावनिक साद देतील ही अपेक्षा नव्हती Rohit Pawar on Ajit Pawar।
रोहित पवार पुढे, अजित पवार बारामतीकरांना भावनिक साद देतील ही अपेक्षा नव्हती आणि अजित पवारांचा हा निर्णय लोकांना आणि कुटुंबालादेखील पटला नाही आहे. मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर मला वेगळं काहीतरी मिळालं असतं, असं अजित पवार म्हणाले. मात्र मंत्री, उपमुख्यमंत्री पद त्यांना मिळालं. राज्याचे प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. आता त्यांना अजून वेगळं काय पाहिजे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
भाजपकडून पवार विरुद्ध पवार हा संघर्ष Rohit Pawar on Ajit Pawar।
अजित पवार भाजपसोबत जाण्याचं कारण पद आहे का? आणि पद असेल तर विचारसरणी कुठे गेली?, असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले आहे. भाजपला जे जमलं नाही ते अजित पवारांच्या माध्यमातून भाजप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पवार विरुद्ध पवार हा संघर्ष भाजप करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.