Rohit Pawar ED । Sugar Factory। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामागे खंबीरपणे उभे असलेले युवा नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई केली आहे. रोहित पवार यांना एक मोठा झटका बसला आहे. कारण, आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने खरेदी केलेला साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखाना खरेदी केला होता. । Rohit Pawar ED
या साखर कारखान्याची 161.30 एकर जमीन, प्लांट, मशिनरी आणि बिल्डिंग स्ट्रक्चर्स हे जप्त केलं आहे. हा साखर कारखाना सध्या मेसर्स बारामती अॅग्रो लिमिटेडच्या ताब्यात आहे. दरम्यान, ज्या कारखान्याबाबत ही कारवाई करण्यात आली होती, त्याच कारखान्याला आज रोहित पवारांनी भेट दिली.
यावेळी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्याच्या कर्मचारी यांच्याशी संवाद साधतांना त्यांनी आपल्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी रोहित पवार यांनी भाजप पक्षावर जोरदार टीका केली. रोहित पवार म्हणाले की, “माझ्याविरोधात काहीही सापडलं नाही म्हणून लोकसभेच्या आचारसंहितेच्या दोन दिवस अगोदर नोटीस दिली. त्यांची इच्छा आहे मी त्यांच्याकडे यावं, आता फक्त अटकेची कारवाई बाकी आहे. पुढील काळात मी असेच फिरत राहिलो, तर पुढील दोन-तीन महिन्यात मला जेलमध्ये टाकले जाईल असे वक्तव्य रोहित पवारांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, आज लढण्याची वेळ आली असून, आम्ही सर्वजण लढतोय. सर्व म्हणतात हा कमी किमतीत कारखाना घेतला, मग तुम्ही का घेतला नाही. आम्ही जमिनीसाठी आलेलो नाही, इथे कारखाना चालविण्यासाठी आलेलो आहे. ईडीने सोशल मीडियावर कारखान्याला नोटीस टाकली, मात्र अजूनही ती नोटीस माझ्या हातात आलेली नाही.
आम्ही घाबरत नाही, आम्ही कधीही घाबरणार नाही. कारवाई का होत आहे, कारण मी त्यांचं ऐकत नाही. मी भाजपसोबत जात नसल्याने कारवाई केली जात आहे. ईडीला मी सर्व सहकार्य केलं, सर्व उत्तरे मी दिली आहे. मी असंच फिरत राहिलो, तर मला काही दिवसांत अटक होणार आहे. मला देखील हे माहित आहे.’ असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
“महाराष्ट्रातही ईडीचा गैरवापर’ – शरद पवार । Rohit Pawar ED
“महाराष्ट्रात या सगळ्याचतपस यंत्रणांचा वापर सुरु झाल्याचं दिसतं आहे. रोहित पवार यांना दोन ते तीन दिवसांत चौकशीसाठी बोलवलं गेलं आणि त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई सुरु करणं हे दिसतं आहे. त्यांच्यावरचा आरोप असा आहे की ते साखर कारखाना विकत घेतानाचं त्यांचं टेंडर मोठं होतं.
आता बँकेने विकलेल्या कारखान्यांची यादी पाहिली तर ते 25 कोटींच्या आत साखर कारखाने विकले गेले तिथे कारवाई नाही. 54 कोटीला कारखाना गेल्यावर चौकशी सुरु झाली. दहशत निर्माण करणं, सक्रिय कार्यकर्त्याला थांबवणं हे यामागे दिसतं आहे.” असं शरद पवार म्हणाले. । sharad pawar