मुंबई – हिटमॅन रोहित शर्मा याचा स्वभाव व मैदानावरचे शांत वर्तन हे माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी याच्यासारखेच आहे. संघ कोणत्याही स्थितीत असो धोनी जसा शांत राहून आपल्या योजना अंमलात आणायचा व त्या यशस्वीही करून दाखवायचा तेच रोहितही करतो, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
विराट कोहलीच्या जागी रोहितकडे भारतीय संघाचे नेतृत्व आल्यामुळे संघ एका दिवसांत सगळे सामने जिंकेल असे नाही. मात्र, रोहितच्या नेतृत्वात संघाची कामगिरी सध्यापेक्षाही जास्त उंचावेल, असा विश्वासही शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.