रॉबर्ट वढेरांना मोठा दिलासा; ‘अटींसह’ अटकपूर्व जामीन मंजूर

नवी दिल्ली : आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या हिट लिस्टवर असलेल्या रॉबर्ट वढेरा यांना आज विशेष सीबीआय कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेव्हणे आणि उत्तरप्रदेशच्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना अटक होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केली जात होती मात्र आज सीबीआय कोर्टाने त्यांना ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे.

रॉबर्ट वढेरा यांचे निकटवर्तीय असणारे मनोज वर्मा यांना देखील सीबीआय कोर्टाकडून दिलासा मिळाला असून त्यांना देखील ५ लाखांच्या जातमुचलक्यावर जमीन मंजूर करण्यात आला आहे. रॉबर्ट वढेरा व मनोज अरोरा हे दोघेही सध्या अंतरिम जामिनावर बाहेर होते.

सीबीआय कोर्टाने वढेरा व अरोरा यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जमीन मंजूर करताना त्यांच्यावर काही अटी देखील लादल्या आहेत. या अटींनुसार वढेरा व वर्मा यांना कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडता येणार नाही, तसेच या प्रकरणामधील चौकीशीला त्यांना सहकार्य करावे लागणार असून चौकशीसाठी त्यांना वेळोवेळी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच याप्रकरणातील साक्षीदार तसेच पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये असे देखील कोर्टाने त्यांना बजावले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.