छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्याकडून नरेंद्र मोदींना आरसा भेट

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचत असल्याचं चित्र आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप यांची चांगलीच फैरी झडत असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरसा भेट पाठवला आहे.

मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून आरसा ऑर्डर केल्याची रिसीट ट्विट करत,” मी आपल्याला भेटीच्या स्वरूपात आरसा पाठवत आहे. हा आरसा आपल्या लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी अशा ठिकाणी लावा, जेणेकरून तुम्ही सर्वाधिक वेळा ये-जा करता. ज्यावरून आरशात स्वतःचा चेहरा वारंवार पाहून तुम्ही स्वतःचा तुमचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करू शकाल.” असे म्हंटले आहे.

पुढे आपल्या अजून एका ट्विट मध्ये मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी, आपण पाठवलेला आरसा तुम्ही फेकून द्याल. पण या निवडणुकीत १२५ कोटी जनताच आपल्याला आरसा दाखवेल अशी उपरोधिक टीका मोदींवर केली आहे. तसेच भुपेश बघेल यांनी मोदींना पत्र लिहिले असून या पत्रात मोदींवर टीकेचा भडीमार केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.