जळोची -बारामती शहरात गुरुवार (दि. 16) पासून लॉकडाऊन सुरू झाल्याने शहरात शुकशुकाट असून सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.
तर गुरुवार (दि. 23) पर्यंत हे लॉकडऊन कायम राहणार आहे. बारामती नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून शहराच्या चारही बाजूंच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
मास्क न वापरणे, विनाकारण रस्त्यावर फिरणे, गर्दी करून थांबणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याकामी नगरपालिका प्रशासन पोलिसांना मदत करीत आहे.