दक्षिण-पश्चिम बांगलादेशात शनिवारी एक प्रवासी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या तलावात पडली. या अपघातात 17 जणांना जीव गमवावा लागला. त्याचवेळी डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, झलकाठी जिल्ह्यात 60 हून अधिक प्रवाशांना घेऊन ही बस भंडारिया उपजिल्ह्यातून दक्षिण-पश्चिम विभागीय मुख्यालय बारिशालकडे जात असताना हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस तलावात पडली. 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांमध्ये आठ महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे.
बसमध्ये आणखी काही मृतदेह अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. इतर वीस प्रवाशांवर ढालकठी येथील मुख्य शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये 60 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बस तलावात पडल्याने रुग्णांच्या पोटात पाणी गेले आहे. उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.