पुणे –सामूहिक बलात्काराच्या घटनेतून पुणे शहर सावरले नसतानाच गुरुवारी पहाटे आणखी एक प्रकार पुणे स्टेशन परिसरात घडला. रिक्षाचालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तीच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी काही तासांतच आरोपीला जेरबंद केले.
पुणे स्टेशन बसस्थानकालगत पीडित मुलीचे कुटुंब राहाते. पहाटे पीडित मुलगी आईच्या कुशीत झोपली असताना आरोपी रिक्षाचालकाने तीला उचलून रिक्षात ठेवले. यानंतर रिक्षा थेट मार्केटयार्ड येथील एका पडीक इमारतीजवळ नेली. तेथे इमारतीच्या वरच्या मजल्यावर तीला नेऊन बलात्कार केला.
दरम्यान, घरच्यांना जाग आल्यावर मुलगी कुशीत नसल्याचे दिसले. त्यांनी सुरवातीला आजूबाजूला शोध घेतला. मात्र, ती मिळून न आल्याने त्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही नुकत्याच घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसर पिंजून काढला. तसेच, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा माग काढत काढत त्याला मार्केटयार्ड परिसरात जेरबंद केले. यानंतर पीडित मुलीला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले.
तक्रार प्राप्त होताच, पोलिसांची पथके मुलीच्या शोधासाठी रवाना झाली. तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. आरोपीचे सागर मारुती मांढरे (वय 39, कात्रज) असे आहे.
– यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन