मुंबई – महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे नुकतंच निधन झाले असून, नारायण यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने दुःख व्यक्त केलं आहे. हृतिकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक ट्विट शेअर केलं आहे. .’अनेकांना माहिती नाहीये की आपण किती मोठ्या गणितज्ञांना गमावलंय, वशिष्ठ नारायण सिंह यांचा बिहारमधील एका छोट्याशा गावात जन्म झालाय. त्यांनी कित्येक अवघड गणितं सोडवली आहेत.’ असं हृतिकनं म्हंटल आहे.
Not many people know that yesterday we lost one of the biggest mathematicians that India produced in modern era. Vashishtha Narayan Singh, born in a village in Bihar, solved some of the most difficult equations of mathematics. Deeply saddened by his demise. https://t.co/uYL1mYhzrJ
— Hrithik Roshan (@iHrithik) November 15, 2019
काही दिवसांपूर्वीच त्यांना घरी नेण्यात आलं होतं. मात्र, गुरुवारी त्यांची तब्येत बिघडल्यामुळं पुन्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं जवळपास एक तास वशिष्ठ यांचा मृतदेह रुग्णालयाबाहेरच असल्याचं समोर आलं आहे. वशिष्ठ नारायण वशिष्ठ यांनी नासा आणि कॅलिफॉर्निया विद्यापीठात काम केलंय.