कसली मंदी… उमेदवाराच्या मालमत्तेत 18 महिन्यात चक्क 160 कोटींनी वाढ

बंगळुरू : मंदी… मंदी म्हणून सारखं काय ओरडताय? कसली मंदी… अहो भाजपाच्या एका उमेदवाराच्या मालमत्तेत 18 महिन्यात चक्क 160 कोटी रुपयांनी वाढ झाली. कॉंग्रेसमधून फुटून भाजपात आलेले एम. टी. बी. नागराज यांनी हे शक्‍य करून दाखवले आहे. ते होस्कोट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रातून ही माहिती प्रकाशझोतात आली. ते तब्बल एक हजार 223 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक असल्याचे यातून स्पष्ट झाले. देशातील श्रीमंत नेत्यांत त्यांचा समावेश होतो. ते बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातून तीनवेळा विजयी झाले आहेत. त्यांनी कॉंग्रेसच्या पक्षादेशाचा अनादर करून जनता दल – कॉंग्रेस आघाडी सरकार पाडले. त्यावेळी ते राज्यात गृहनिर्माण मंत्री होते. त्यांच्यासह 17 जणांना पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र ठरवण्यात आले होते.

नागराज यांच्याकडे 53 बॅंक खात्यात 47.70 कोटी रुपये बचत आहे. त्यात 1 कोटी 16 लाखाच्या मुदत ठेवी आहेत. त्यांच्या नावावर 419.28 कोटी रुपयांच्या तर पत्नीच्या नावे 164 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्ता आहेत. त्यांची स्थावर मालमत्ता 417.11 कोटी रुपयांची असून वारसा हक्कातून दोन कोटी 64 लाख रूपयांची मालमत्ता मिळाली. त्यांच्या पत्नीने स्वअर्जित मालमत्ता 189.14 कोटीची दाखवली असून वारशांतून त्यांना 27.50 लाखाची मालमत्ता मिळाली. त्यांचे शहरात 93 भूखंड आहेत. त्यांच्याकडे 2 कोटी 54 लाखअंची वाहने असून त्यात प्राडो, मर्सिडिस, लॅंड रोव्हर आदी गाड्यांचा समावेश आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर 1.72 कोटीच्या गाड्यांचा ताफा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here