Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. स्पर्धेची 17 वी आवृत्ती 22 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने नुकतेच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बोर्डाने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही.
दरम्यान, उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या स्पर्धेचे उर्वरित सामने भारतातच होतील, असे सांगितल्यावर या अटकळांना पूर्णविराम मिळाला.
स्पर्धा भारतातच होणार…
जय शहा म्हणाले, “नाही, उर्वरित आयपीएल परदेशात होणार नाही,स्पर्धेचे उर्वरित सामने भारतातच होतील.” खरं तर, सोशल मीडियावर काही काळ अशी चर्चा होती की बीसीसीआय आगामी निवडणुकीमुळे आयपीएलची उर्वरित स्पर्धा देशाबाहेर आयोजित केली जाऊ शकते. मात्र, बीसीसीआय सचिवांच्या या वक्तव्याने या अटकळांना पूर्णविराम दिला आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/mathisha-pathirana-out-of-ipl-league-for-four-to-five-weeks-due-to-hamstring-injury/
निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत, ज्या 19 एप्रिल ते 4 जून या कालावधीत सात टप्प्यांत होणार आहेत. आता मतदानाच्या तारखा निश्चित झाल्यामुळे, बीसीसीआय आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे.